S M L

शिवसेना तुमच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंच्या दुष्काळी दौर्‍याला सुरुवात

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2015 02:15 PM IST

शिवसेना तुमच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंच्या दुष्काळी दौर्‍याला सुरुवात

12 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दुष्काळ दौर्‍यावर आहेत. ते काल दुपारी चारच्या सुमारास औरंगाबाद शहरात दाखल झालेत. उद्धव ठाकरे यांनी आज खुलताबाद तालुक्यातल्या रत्नपूर गावाला भेट दिली. शिवसेना तुमच्यासोबत आहे. शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये अशी विनंती उद्धव ठाकरेंनी यावेळी शेतकर्‍यांना केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शुक्रवारचा नियोजित दुष्काळ दौरा रद्द झाल्यानंतर आज त्यांनी दौर्‍याला सुरूवात केली. खुलताबाद तालुक्यातील गावाच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकारनं दुष्काळ पाहणीची नाटकं बंद करून राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी शिवसेना शेतकर्‍यांच्या मुलींसाठी कन्यादान योजना लवकरच सुरू करणार असल्याचं घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलींची लग्न सामुदायिक लग्नसोहळ्यात लावणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांच्या हस्ते शेतकर्‍यांना मदतीचंही वाटप करण्यात आलं. त्यानंतर दुपारी फुलंब्री येथे ते दुष्काळपाहणी करतील. या पाहणीनंतर उद्धव ठाकरे सेना पदाधिकार्‍यांची बैठकही घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2015 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close