S M L

ज्यांना धर्म पाळायचाय त्यांनी तो आपापल्या घरी पाळावा- उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Sep 13, 2015 03:59 PM IST

 ज्यांना धर्म पाळायचाय त्यांनी तो आपापल्या घरी पाळावा- उद्धव ठाकरे

13 सप्टेंबर :जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वादरम्यान मांसविक्री बंदीच्या वादावर आता शिवसेनेतर्फे पडदा पडला, असून ज्यांना धर्म पाळायचा आहे त्यांनी आपापल्या घरी पाळावा दुसर्‍यांवर कोणावर आपल्या धर्माची जबरदस्ती करु नये, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपलं मत व्यक्त केलं.

मांसबंदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन धर्मगुरूंनी रविवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून मांसविक्रीवर आमच्याकडून पडदा पडला असल्याचे जाहीर केलं. मात्र पर्युषण काळात राजकारण करण्यात आलंय त्याचा शोध घेतोय. जैन बांधव अनेक वर्षांपासून पर्युषणपर्व पाळतात. पण, याच वर्षी मांसबंदीवरून वाद अचानक का उफाळून आला असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी भाजपाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही, असंही स्पष्ट करत आम्हाला जी लढाई करायची आहे ती आम्ही समोरासमोर करतो असंही ते म्हणाले आहेत.

पर्युषण पर्व पाळण्यास शिवसेनेचा विरोध कधीही नव्हता. सक्तीच्या शाकाहाराची भूमिका मान्य नव्हती; पण आता शिवसेनेच्या दृष्टीने हा विषय संपला असून तो आम्हाला अधिक वाढवायचा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आधीच म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2015 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close