S M L

महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्यामागे शरद पवार - बाळासाहेब विखे-पाटील

Samruddha Bhambure | Updated On: Sep 13, 2015 07:39 PM IST

महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्यामागे शरद पवार - बाळासाहेब विखे-पाटील

13 सप्टेंबर : महाराष्ट्रात शरद पवार यांनीच काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचे काम केलं, असा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी रविवारी केला. काही दिवसांपूर्वीच बाळासाहेबांनी पवारांना उद्देशून 'बारामतीकरांनीच' राज्याच्या विकासाच खेळखंडोबा केला, अशी टीका केली होती. त्यानंतर आज (रविवारी) पुन्हा एकदा त्यांनी शरद पवारांवर तोंडसुख घेतले. सर्व प्रयत्न करून सुद्धा सत्तेत सहभागी होता न आल्याने आणि सिंचन घोटाळे उघड होत असल्यानेच आता राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चे काढत असल्याचा गंभीर आरोप विखे यांनी केला.

बारामतीकरांनी नेहमीच काँग्रेस बरोबर निवडणुका लढवल्या. एकीकडे त्याचा केंद्रात आणि राज्यात फायदा घेतला तर दुसरीकडे काँग्रेसला कमकुवत करण्याचं कामही त्यांनी केलं, असल्याचा आरोप बाळासाहेबांनी केला. महाराष्ट्रात पाणी प्रश्न अतिशय गंभीर असून त्यावर कोणीही राजकारण करू नये मात्र बारामतीकर प्रश्न सोडवण्यापेक्षा तरुणांची माथी भडकवत आहेत असंही विखे यांनी केलाय. पाणी प्रश्नावर मोर्चा काढणार्‍या बारामतीकरांनी सत्तेत असताना किती धरणे बांधली असा सवाल विखेंनी केला आहे. एवढंच नाही तर मोर्चे काढण्यापेक्षा शेतकर्‍यांना मदत करा, वेळ प्रसंगी कर्जरोखे उभे करा असे आवाहनही यावेळी विखे यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2015 07:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close