S M L

शाहीस्नानासाठी कमी पाणी सोडा, हायकोर्टाचे सरकारला आदेश

Sachin Salve | Updated On: Sep 14, 2015 05:19 PM IST

शाहीस्नानासाठी कमी पाणी सोडा, हायकोर्टाचे सरकारला आदेश

14 सप्टेंबर : राज्यात एकीकडे दुष्काळ आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्नही पेटलाय. पाण्याची उधळपट्टी थांबवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. 18 आणि 25 तारखेला शाहीस्नानाच्या वेळी गंगापूर धरणातून कमी पाणी सोडा, असे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहे आणि याबाबत 21 तारखेपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करा असंही नमूद केलंय.

ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. एच.एम.देसरडा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असताना धरणातील पाणी गोदीवारीत सोडण्यात यावं अशी मागणी देसरडा यांनी केली होती. कमी पावसामुळे मराठवाड्यात अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालीये. परंतु, महाकुंभात शाहीस्नानासाठी आतापर्यंत 3 टिएमसी पाणी सोडण्यात आलंय. शाहीस्नानासाठी पाणी सोडण्यापेक्षा गोदापात्रात पाणी सोडल्यास दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा मिळेल अशी भूमिका देसरडा यांनी मांडली. हायकोर्टाने याचिकेची दखल घेत येणार्‍या 18 आणि 25 तारखेला शाहीस्नानाच्या वेळी कमी पाणी सोडा असे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2015 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close