S M L

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?, उद्योगांसाठी 8 व्या क्रमांकावर

Sachin Salve | Updated On: Sep 14, 2015 11:50 PM IST

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?, उद्योगांसाठी 8 व्या क्रमांकावर

14 सप्टेंबर : केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार असो की, राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार असो, 'ईज ऑफ डुइंग बिझिनेस' हा सध्या परवलीचा शब्द आहे. आता जागतिक बँकेनं भारतामध्ये उद्योग उभारण्यासाठी वातावरण कसं आहे याचा आढावा घेतलाय आणि त्याचा अहवाल प्रसिद्ध केलाय. मात्र, त्यातून समोर आलेली माहिती फारशी उत्साहवर्धक नाही. देशामध्ये गुजरात सुलभ व्यापारासाठी पहिल्या स्थानावर असून महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे.

उद्योगांसाठी भारतातली कुठली राज्ये चांगली आहेत, या संदर्भातला अहवाल जागतिक बँकेने आज सादर केला. यात जाहीर केलेल्या मानांकनानुसार पहिल्या स्थानावर गुजरात असून पाठोपाठ आंध्रप्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे. मात्र या यादीत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तसेच या यादीत अरुणाचल प्रदेश शेवटच्या स्थानावर आहे

भारताचं स्थान 142वं

- या आर्थिक वर्षात जगातल्या 189 देशांपैकी भारताचं स्थान 142व्या क्रमांकावर आहे.

- म्हणजेच भारतात व्यवसाय उद्योग उभारण्यासाठी वातावरण चांगलं नाही

- गेल्या वर्षी भारताचं स्थान 140वं होतं

- पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या शेजारी देशांपेक्षा भारताचं स्थान खाली

देशात महाराष्ट्राचं स्थान 8वं

- भारतामध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर

- आंध्र प्रदेश दुसर्‍या, झारखंड तिसर्‍या, छत्तीसगड चौथ्या आणि मध्य प्रदेश पाचव्या स्थानावर

- महाराष्ट्राचं स्थान मात्र आठवं आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2015 11:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close