S M L

जेलभरो आंदोलन : नाशिकमध्ये पोलिसांनी छगन भुजबळांना ताब्यात घेऊन सोडलं

Samruddha Bhambure | Updated On: Sep 15, 2015 02:57 PM IST

जेलभरो आंदोलन : नाशिकमध्ये पोलिसांनी छगन भुजबळांना ताब्यात घेऊन सोडलं

15 सप्टेंबर : दुष्काळ आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये काल (सोमवारी) हे आंदोलन करण्यात आलं. त्यापाठोपाठ आज (मंगळवारी) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ स्वत: नाशिकमध्ये आंदोलनाचं नेतृत्त्व करताहेत. त्यांना काहीवेळातचं पोलिसांनी ताब्यात घेतंल. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गही काहीवेळ रोखून धरला होता, त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडीही झाली आहे.

 नाशिकबरोबरच अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करतेय. मराठवाड्याप्रमाणेच नगर, नाशिक तसचं आणखी काही तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थीती आहे . त्यामुळे या आंदोलनाकडे या सार्‍यांच लक्ष लागलं आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना त्वरित कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करावं आणि तातडीने चाराछावण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, कालपासून जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आले. सोमवारी जालन्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. तर औरंगाबादमध्ये दिलीप वळसे-पाटील, लातूरमध्ये जयंत पाटील, परभणीमध्ये धनंजय मुंडे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केलं. दरम्यान, याच मुद्द्यवरून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काल (सोमवारी) दुपारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2015 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close