S M L

मराठी बोलणार्‍यांनाच मिळणार रिक्षाचा परवाना, रावतेंची घोषणा

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2015 09:34 PM IST

मराठी बोलणार्‍यांनाच मिळणार रिक्षाचा परवाना, रावतेंची घोषणा

15 सप्टेंबर : 'किधर जाने का ?, मै नही जाऊंगा, रिक्षाखाली नही हैं...'आता ही हिंदीगिरी बंद करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला असून मराठी बोलणार्‍यांनाच रिक्षाचा परवाना देणार अशी घोषणाच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलीये. तसंच रिक्षाचालकाला नुसचं मराठी बोलता येण गरजेचं नाही तर त्याला लिहिता येणही बंधनकारक असणार आहे असं रावतेंनी स्पष्ट केलं.

शिवसेनेनं पुन्हा एकदा मराठी मुद्दा हाती घेतलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मराठी बोलता येणार्‍यांनाच रिक्षाचे परवाने देणार अशी घोषणा केलीये. एवढंच नाहीतर नवीन परवान्यासाठी महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला सुद्धा यापुुढे बंधनकारक असणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात 1 लाख नवीन परवाने देण्यात येणार आहे. एक लाख चाळीस हजार पासष्ट परवान्यांचं नुतनीकरण करणार आहे. राज्यातील रद्द किंवा व्यपगत झालेल्या ऑटोरिक्षांच्या परवान्यांचे नुतनीकरण झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रात एक लाख एवढे नवीन ऑटोरिक्षा परवाने लॉटरी पद्धतीने वाटण्यात येतील.

तसेच पुणे, सोलापूर , नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात सध्याच्या असलेल्या ऑटोरिक्षा परवान्यांच्या 25 टक्के एवढे ऑटोरिक्षाचे नवीन परवाने दिले जातील. नवीन ऑटोरिक्षा परवान्यांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात 15 हजार तर राज्यातील इतर क्षेत्रात 10 हजार रुपये एवढे परवाना शुल्क आकारण्यात येईल, अशी माहिती ही परिवहन मंत्र्यांनी यावेळी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2015 08:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close