S M L

दुष्काळग्रस्तांना 'खिलाडी'कडून 90 लाखांची मदत

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2015 09:59 PM IST

दुष्काळग्रस्तांना 'खिलाडी'कडून 90 लाखांची मदत

15 सप्टेंबर : दुष्काळाची दाहकता एवढी झाली आहे की सिने कलावंत देखील आता गहिवरून मदतीसाठी पुढे येवू लागली आहेत. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे या सिने कलावंत नंतर बॉलिवूड स्टार अक्षय कुमार देखील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियांना मदत करतोय, ज्या कुटुंबात शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर पुढ कमावती व्यक्ती नाही अशा बीड जिल्ह्यातील 30 कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजार रुपये एवढी मदत अक्षय कुमारने केली आहे. आज त्या मदतीच वाटप स्वीय सहयाकाच्या हस्ते बीड इथं करण्यात आलं. नाना पाटेकरने दिलेल्या आवाहनास साद घालत अक्षयकुमार पुढ सरसावला आहे. अक्षयकुमार मराठवाड्यातील इतर 6 जिल्ह्यातही तो मदत करणार आहे. एकूण तो 90 लाखांची मदत देणार आहे.

बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असतांना दूसरीकडे शेतकरी आत्महत्येच सत्र काही केल्या थांबत नाही. त्यामुळे अशा कुटुंबियांना मदत करण्याच्या उद्देशाने अक्षयकुमार याने जिल्ह्यातील अशी काही आत्महत्याग्रस्त कुटुंबीय शोधून या कुटुंबियांना 50 हजार रुपयाची मदत केली. यापुढे प्रत्येक महिन्यात तो 15 लाख प्रमाणे एकूण 90 लाखांची मदत पुरवणार आहे.

मुंबईत एका प्रिमियर शो मध्ये अक्षयकुमार ची भेट झाली असता त्याच्याशी मराठवाड्यातील दुष्काळाबाबत आपण वस्तुस्थिती सांगताच त्याला देखील गहिवरून आलं आणि त्याने 30 कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी बीड इथं सांगितलं.

घरातल कमवता माणूस गेल्यानं कसं जगावं हा रोजच प्रश्न असल्याचं उषाबाई खंडागळे या पीडित महिलेनं सांगितलं. तर पतीच्या

पश्च्यात आजारी मुलीचा उपचार कसा करावं असा प्रश्न समोर होता परंतु या मदतीनं जगण्याची उमेद वाढली असल्याचं जेब पिंपरी येथील महिला शेतकर्‍यानं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2015 09:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close