S M L

उच्चशिक्षित तरुणी होती माओवादी, चकमकीत ठार

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2015 11:54 PM IST

उच्चशिक्षित तरुणी होती माओवादी, चकमकीत ठार

15 सप्टेंबर : माओवादी चळवळीत उच्चशिक्षित तरुणींचाही सहभाग असल्याचं आढळून आलंय. तेलंगणा पोलिसांनी चकमकीत दोन माओवाद्यांना ठार केलं. त्यात श्रृती नावाच्या एका 23 वर्षांच्या तरुणीचा सहभाग आहे. मृत श्रृती एमटेकची पदवीधर असल्याचं आढळून आलंय.

तेलंगाणात घुसखोरी करुन माओवादी कारवाया सक्रिय करण्याचे माओवाद्यांनी प्रयत्न सुरू केलेत. तेलंगाणा पोलिसांनी चकमकीत दोन जहाल माओवाद्यांना ठार केलं. त्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. सकाळी वारंगल जिल्हयात ताडवाईच्या जंगलात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक महिला आणि एक पुरुष माओवाद्याला ठार करण्यात आलं. त्यात 23 वर्षांच्या एमटेक झालेल्या श्रृतीचा समावेश होता. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणाहून एके 47 सह शस्त्रसाठा जप्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2015 11:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close