S M L

दुष्काळाचा बळी, विहिरीत पडून महिलाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Sep 16, 2015 10:35 PM IST

दुष्काळाचा बळी, विहिरीत पडून महिलाचा मृत्यू

16 सप्टेंबर : दुष्काळानं अनेक कुटुंबं उद्‌ध्वस्त केली आहेत. अशीच एक घटना बीडमध्ये घडलीये. जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झालाय.

मोरवड गावात पाण्याची टंचाई आहे.त्यामुळे काशीबाई अडील ही महिला आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतात त्या पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे पती गोरख अडील बाहेरगावी गेले होते. विहिरीतून पाणी शेंदताना पाय घसरून काशीबाई विहिरीत पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा श्रीराम शाळेतून आल्यावर तो आईचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला. तेव्हा विहिरीत आईचा मृतदेहच त्याला दिसला.त्यानंतर आरडाओरड झाली आणि काशीबाईचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी परतीचा पाऊस बीड जिल्ह्यात अगदीच थोड्या ठिकाणी झालाय. पण त्यानंतर प्रशासनानं टँकर्सची संख्या कमी केलीये. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला लोकांना सामोरं जावं लागतंय.महिलांना मैलो न् मैल पायपीट करावी लागतीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2015 10:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close