S M L

मुख्यमंत्र्यांनीच बोलतांना पथ्य पाळावं : मुत्तेमवारांनी डागली तोफ

7 जानेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे बोलताना पथ्य पाळावं असा पलटवार विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. आम्ही विदर्भाच्या मुद्द्यावर जाहीरपणे बोलणारच असंही विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस अंतर्गत जोरदार वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचा बुधवारी नागपूरमध्ये नागरी सत्कार होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या मुद्यावरुन गोंधळ घालणार्‍यांना खडसावलं होतं. त्या वक्तव्याला धरुन विलास मुत्तेमवार यांनी हि प्रतिक्रिया दिली. विदर्भाच्या मुद्दावरून आता विदर्भवादी नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. दरम्यान स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावरून विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी गुरुवारी राष्ट्रपतींची अमरावतीत भेट घेतली. राष्ट्रपती प्रतिभा पाटील सध्या विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पुढाकार घेऊन मांडा अशी विनंती काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिभाताई पाटील यांच्याकडे केली. यावेळी मुत्तेमवार यांच्याबरोबर खासदार दत्ता मेघे आणि विदर्भातले 11 आमदार बरोबर होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2010 08:26 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2010 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close