S M L

पानसरे हत्या प्रकरण : कोल्हापूर पोलिसांनी कर्नाटकातून दोघांना केली अटक

Samruddha Bhambure | Updated On: Sep 17, 2015 12:52 PM IST

PANSARE AROOPI

17 सप्टेंबर : कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी कर्नाटकातून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. श्रीधर जाधव, सुशील जाधव अशी त्यांची नावं आहेत.

कर्नाटकातील संकेश्वरमधून ताब्यात घेण्यात आलेले हे दोघे समीर गायकवाडचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. सनातन संस्थेशी संबंध असणार्‍या समीर गायकवाडला काल (बुधवारीझ पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

समीरच्या चौकशीनंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवल्याची माहिती देण्यात आली आहे. या पथकाच्या कारवाईत आतापर्यंत काही जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2015 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close