S M L

नुकसानभरपाईसाठी बेपत्ता खलाशांच्या नावावर दिले चेक

8 जानेवारी फियानग्रस्तांच्या नुकसान भरपाईचा चेक बेपत्ता मच्छीमाराच्या नावाने काढण्याचा प्रताप रत्नागिरी मत्स्यविभागाने केला आहे. फियानच्या मोबदल्याचा चेक वारसांच्या नावाने न देता वादळात बेपत्ता झालेल्या बोटमालकाच्या नावाने दिला आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या राजीवडा भागात राहणार्‍या कुटुंबाला फियान वादळ होऊन दोन महीने उलटले तरीही सरकारी मदतीचा लाभ मिळालेला नाही. रत्नागिरीतल्या सुवर्णदुर्गकर कुटूंबातले चौघे कमावते मच्छीमार फियानमध्ये बेपत्ता झालेत. बोटीची नुकसानभरपाई म्हणून मत्स्यविभागाने 30 नोव्हेंबर 2009 रोजी दिलेला 60 हजाराचा चेक बेपत्ता बोटमालक फारुख सुवर्णदुर्गकर यांच्या नावे काढला. अल अमिन ही त्यांची बोट अद्याप मिळालेली नाही. बोटीवर 2 लाख 60 हजाराचं कर्जही आहे. फारुख हे बेपत्ता असल्यामुळे हा चेक त्यांच्या कुटुंबीयांना वटवता येत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2010 09:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2010 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close