S M L

मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतूक हळूहळू पुर्वपदावर

Sachin Salve | Updated On: Sep 18, 2015 08:15 PM IST

मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतूक हळूहळू पुर्वपदावर

18 सप्टेंबर : मुसळधार पावसामुळे जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पावसाचा हाहाकार पाहण्यास मिळाला. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला. अखेर आता हायवेवरच पाणी ओसरलंय. त्यामुळे वाहतूक पाचवाजेपासून सुरळीत झालीये. तर रेल्वे वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर आलीये. अपकडे जाणार्‍या चार लाईन्स खुल्या असून त्यावरच सर्व वाहतूक वळवण्यात आलीय. रात्री 9 वाजेपर्यंत वाहतूक पूर्वपदावर येईल असं रेल्वे प्रशासननं सांगितलं.

मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. डोंगरदर्‍यातील सगळं पाणी एक्स्प्रेस वेवर आल्याने रस्त्याच्या एका बाजूने नदीचं स्वरुप आलं होतं. लोणावळा-खंडाळा परिसरात जोरदार पावसामुळे कामशेत बोगदा ते उर्से टोलनाक्यादरम्यान रस्त्यावर पाणी आलं आहे. याशिवाय वडगाव, मावळ येथील कुडेवाडा येथे हायवेवर तर तळेगाव-लोणावळा दरम्यान, पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. आज संध्याकाळी पाचवाजता हायवेवरच पाणी ओसरल्यामुळे वाहतूक सुरू झालीये.

रेल्वे वाहतूक हळूहळू पुर्वपदावर

मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. कामशेत-वडगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. पाण्यामुळे ट्रॅकखालची खडी वाहून गेली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली होती. आता अपकडे जाणार्‍या चार लाईन्स खुल्या असून त्यावरच सर्व वाहतूक वळवण्यात आलीय. ज्या ठिकाणी रूळाखालची खडी वाहून गेली त्या ठिकाणी खडी घलण्यासाठी बोल्डर स्पेशल ट्रेन लोणावळ्याहून निघाली असून रात्री 9.30 नऊ वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत होईल असं रेल्वेचे माहिती अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2015 08:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close