S M L

गुप्त धनासाठी विहीरीच खोदकाम

8 जानेवारीकोल्हापुरातील हुपरी गावात सध्या गुप्त धनाचा शोध सुरु आहे. या गावातील एका विहीरीत धनाचा हंडा आणि तुळजाभवानी देवीची मुर्ती असल्याचा साक्षात्कार बार्शीतल्या निवृत्त मुख्याध्यापिका वैशाली टिकळ यांना झाला आहे. त्यासाठी त्यांनी गावातील एका जुनाट विहीरीत जेसिबी लावुन खोदकामाला सुरुवात केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विहीरीच्या खोदकामचा शुभारंभ गावातील सरपंच सुभाष कागले यांच्याहस्ते करण्यात आला. पण विहीरीचं खोदकाम करत असताना प्रशासनाची कोणतीचं परवानगी घेतली नाही. तरीही प्रशासनं मुग गिळुन गप्प आहे. शुक्रवारी दुसर्‍या दिवशीही खोदकाम सुरूच आहे. वास्तविक अशा प्रकारच्या गुप्त धनाच्या शोधासाठी सुरु केलेल्या खोदकामाला जिल्हा प्रशासनाने तात्काळ बंदी आणणं आवश्यक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2010 12:17 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2010 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close