S M L

गोंदियात नाल्याच्या पुरात वाहून आई आणि मुलीचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Sep 19, 2015 01:23 PM IST

गोंदियात नाल्याच्या पुरात वाहून आई आणि मुलीचा मृत्यू

 19 सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कुवाढास नाल्याच्या पुरात एका आई आणि मुलीचा मृत्यू झालाय. भुमेश्‍वरी बाबुलाल बिलोने (32) हिच्यासह तिच्या दोन मुली वाहून गेल्या. मात्र, त्यापैकी भाग्यश्री बाबुलाल बिलोने या अडीच वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यात गावकर्‍यांना यश आले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. जयश्री बिलोने या अडीच वर्षांच्या चिमुकलीचा अद्याप शोध लागला नाही. या दोन्ही मुली जुळ्या आहेत.

सालेकसा तालुक्याच्या बिंजली गावातील भुमेश्‍वरी बिलोने आपल्या दोन मुलींना घेऊन माहेरी आली होती. शुक्रवारी ही महिला आपल्या सासरी परत जात असताना धानोली रेल्वे स्थानकावर उतरली आणि तेथून आपल्या बिंझली गावाला जाण्यासाठी रस्त्याने निघाली होती.जात असताना कुवाढास नाला ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेली असता बाजूला असलेल्या लोकांनी धावून भाग्यश्री ला वाचविण्यात यश आले. मात्र, जयश्री आणि भुमेश्वारीला वाचवता आले नाही. या आधीही याच नाल्यातून अनेक लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गावकरी यांनी या पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सालेकासा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2015 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close