S M L

'झेंडा'च्या वादावरून मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे, नितेश राणेंना फटकारलं

8 जानेवारीझेंडा सिनेमाच्या राजकीय सेन्सॉरशिपवरून मुख्यमंत्र्यांनी नितेश राणे यांना फटकारलं. सेन्सॉरशिपचा अधिकार फक्त सरकारलाच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झेंडा सिनेमाच्या काही सीन्सवर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी आक्षेप घेतला होता. सिनेमाचे निर्माते अवधुत गुप्ते यांना त्यातील काही सीन्स काढायलाही सांगितलं होतं. त्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची प्रतिक्रिया अवधुत गुप्ते यांनी दिली होती. त्यावर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच अवधुत गुप्तेंनी सरकारक डे कोणतीही तक्रार केली नसल्याचं सांगत सरकार पुरेशी मदत द्यायला सक्षम असल्याचंही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2010 12:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2010 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close