S M L

मुंबईकरांना दिलासा; वैतरणा ओव्हरफ्लो,पाणीकपात टळणार ?

Sachin Salve | Updated On: Sep 19, 2015 07:29 PM IST

मुंबईकरांना दिलासा; वैतरणा ओव्हरफ्लो,पाणीकपात टळणार ?

19 सप्टेंबर : मुंबईकरांसाठी खूशखबर....मध्य वैतरणा तलाव तुडुंब भरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारं वैतरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ओव्हरफ्लो होऊन धरण वाहत आहे. त्यामुळे मुंबईकरांवरचे पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.

राज्यभरात पावसाने पाठ फिरवली होती. अखेर गणरायाच्या आगमनानंतर राज्यभर पावसाने दमदार हजेरी लावलीये. मुंबईतही गेल्या दोन दिवसांत बर्‍यापैकी पाऊस झालाय. त्यामुळे धरणांच्या पाण्यात वाढ झालीये. पालघर जिल्ह्यातल्या मध्य वैतरणामधून मुंबईला पाणीपुरवठा होतो. मध्य वैतरणा धरणाच्या परिसरात काल शुक्रवारी दिवसभरात 139.20 मी.मी पाऊस झाला. तलावातील पाण्याची पातळी त्याच्या पूर्ण क्षमतेजवळ पोहोचली. म्हणजेच तलावात 285 मीटरपर्यंत पाणी आल्यानं तलावाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांपैकी या मॉन्सूनमध्ये ओव्हरफ्लो झालेला हा पहिला तलाव आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणीकपातीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2015 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close