S M L

मनसेच्या फेसबुक पेजवर उद्धव ठाकरेंचे फोटो !

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2015 05:14 PM IST

मनसेच्या फेसबुक पेजवर उद्धव ठाकरेंचे फोटो !

22 सप्टेंबर   मनसेच्या फेसबुक पेज आणि ट्विटर हँन्डलवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काही जुने फोटो टाकण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जवळीक वाढतेय का अशी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे यांचे काही दुर्मिळ फोटो 'मनसे अधिकृत'च्या हाती लागले आहेत. काही दशकांपूर्वी राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे कसे दिसायचे याची उत्सकता तुम्हा सगळ्यांना असेल.त्यामुळे हे फोटो देत आहोत अशा ओळी या फोटो खाली देण्यात आल्या आहेत. तर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँन्डलवर ही फोटो टाकण्यात आले असून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेलाही टॅग करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीपासून दोन्ही पक्षांची जवळीक वाढली होती. पुढच्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे फोटो टाकले असावेत का अशीही चर्चा आहे. ही मनसेनं दिलेली टाळी आहे का असाही आता प्रश्न विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2015 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close