S M L

साखरेची किंमत कमी करण्यासाठी पवारांनी कसली कंबर

13 जानेवारी साखरेची किंमत कमी करण्यासाठी कृषीमंत्री शरद पवार जोरदार प्रयत्न करतायत. सर्वत्र सार्वजनिक टिकेचा विषय ठरल्यानंतर शरद पवार यांनी बुधवारी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन महागाई रोखण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. महागाई रोखण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक 27 जानेवारीला नवी दिल्ली येथे बोलावली आहे. तसंच साखरेवरचं आयात शुल्क या वर्षासाठी रद्द केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. साखरेबाबत राज्य सरकार सहकार्य करत नसेल तर अन्य पर्यायांचा विचार करणार असल्यांचं त्यांनी स्पष्ट केलं. यावर्षी आणखी साखर आयात करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. गहू आणि तांदळाचा अधिकचा साठा बाजारात आणला जाणार आहे. साठेबाजांवर कारवाई करण्याचं आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2010 10:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2010 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close