S M L

हॉकी संघातलं वादळ संपलं

13 जानेवारी हॉकीपटू आणि हॉकी इंडियातला वाद संपला आहे. गुरुवारपासून खेळाडू सराव शिबिरात सहभागी होणार आहेत. भारताचे माजी कॅप्टन धनराज पिल्ले आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या मध्यस्थीनंतर हा तिढा सुटल्याचं समजतं. भारतीय हॉकी टीमचे स्पॉन्सर सहारा इंडिया कंपनीनं हॉकी टीमला 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनीही टीमला 5 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. बजाज अलियांझ कंपनीनेही 2 कोटी रुपयांची स्पॉन्सर्सशीप टीमला जाहीर केली आहे. मानधन मिळावं यासाठी भारतीय हॉकी खेळाडूंनी गेल्या दोन दिवसापासून बंड पुकारलं होतं. तर हॉकी इंडियानंही खेळाडूंनी माघार घ्यावी यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. ही मुदत गुरुवारी सकाळी संपणार होती. पण त्याआधीच हा वाद संपला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2010 01:13 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2010 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close