S M L

हजयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी मृतांची संख्या 717 वर

Samruddha Bhambure | Updated On: Sep 24, 2015 11:53 PM IST

हजयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी मृतांची संख्या 717 वर

haja_macca_update424 सप्टेंबर : जगभरातील मुस्लीम बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या मक्का मशिदीबाहेर आज (गुरूवारी) एका धार्मिक विधीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरी होऊन 717 भाविक ठार तर 805 भाविक जखमी झालेत. मक्कामध्ये सैतानाला दगड मारतानाच ही दुर्घटना घडलीय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. हज यात्रेकरूंनी प्रवेशद्वारातूनच बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.

मुस्लीम बांधवांची महत्त्वाची हज यात्रा सध्या सौदी अरेबियामध्ये सुरू आहे. आज सकाळी सैतानाला दगड मारण्याचा विधी सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये किमान 717 जण ठार झाले, तर 800हून अधिक जण जखमी झालेत. हा आकडा वाढण्याची भीती आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये किमान 1 भारतीय महिला आणि जखमींमध्ये 2 भारतीय भाविकांचा समावेश आहे.

हज यात्रेदरम्यान गेल्या दशकातला सर्वात मोठा अपघात आज सकाळी झाला. मक्केजवळ मीना या ठिकाणी सैतानाला दगड मारण्याचा विधी होतो. तेव्हाच अचानक पळापळ सुरू झाली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि शेकडो जणांचे प्राण गेले आणि त्याहून जास्त जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी तिथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतरही यात्रा सुरू राहिली.

मीना हे ठिकाण मक्केपासून 5 किलोमीटर अंतरावर काहीशा खोलगट भागात वसलेलं आहे. इथं चेंगराचेंगरीच्या घटना नवीन नाहीत. प्रेषित आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी जात असताना, या ठिकाणी सैतान आडवा आला. मात्र, प्रेषितांनी दगड मारून त्याला पळवून

लावलं, अशी मान्यता आहे. त्या घटनेची आठवण म्हणून इथं सैतानाला प्रतीकात्मक खडे मारले जातात. त्यासाठी मोठी गर्दी होत असते. अशावेळी भाविकांनी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तसं झालं नाही की, दुर्घटना होतात असं जाणकार सांगतात.

हज यात्रा 5 दिवसांची असते. मंगळवारी ही यात्रा सुरू झाली. सुरक्षेसाठी तब्बल 1 लाख पोलीस तैनात करण्यात आले होते. पण यात्रेच्या तिसर्‍या दिवशी झालेली चेंगराचेंगरी ते टाळू शकले नाहीत. यात्रा सुरू व्हायच्या आधी म्हणजे 11 सप्टेंबरला मशिदीमध्ये बांधकाम सुरू असताना तिथं क्रेन कोसळून शंभरपेक्षा जास्त जणांना प्राण गमवावे लागले होते. आता उरलेले दिवस तरी यात्रा सुखरूप पार पडो अशीच प्रार्थना इथं जमलेले भाविक करत असतील.

 हजदरम्यान दुर्घटना - अलीकडचा इतिहास

- 11 सप्टेंबर 2015 - मक्का - ग्रँड मशिदीत क्रेन कोसळून 107 ठार

- 2006 - मीना - चेंगराचेंगरीमध्ये 360 यात्रेकरू ठार

- 2004 - मीना - हजच्या शेवटच्या दिवशी चेंगराचेंगरी, 244 ठार, शेकडो जखमी

- 2001 - मीना - हजच्या शेवटच्या दिवशी अपघात, 35 ठार

- 1998 - सैतानाला दगड मारताना गोंधळ, 180 ठार

- 1997 - मीना - आग लागून 240 यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू, 1500 जखमी

- 1994- मीना - सैतानाला दगड मारताना चेंगराचेंगरी, 270 ठार

- 1990 - मक्का - चेंगराचेंगरीमध्ये 1,426 यात्रेकरू ठार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2015 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close