S M L

वीरा साथीदार यांना वास्तवातही 'कोर्ट'चा अनुभव, माओवादी संशयावरून घरावर छापे

Sachin Salve | Updated On: Sep 24, 2015 06:25 PM IST

वीरा साथीदार यांना वास्तवातही 'कोर्ट'चा अनुभव, माओवादी संशयावरून घरावर छापे

24 सप्टेंबर : राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त 'कोर्ट' या मराठी सिनेमाला ऑस्करसाठी पाठवण्यात आलं आणि भारतीयांच्या विशेषत: महाराष्ट्रातल्या जनतेचा ऊर अभिमानाने भरला. पण 'कोर्ट' सिनेमात ज्याविषयावर भाष्य करण्यात आलंय त्याचाच प्रत्यक्ष अनुभव या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणारे वीरा साथीदार यांना येतोय.

वीरा साथीदार यांच्यावर माओवादी असल्याचा पोलिसांना संशय आहे. यावरून त्यांच्या घरी अनेकवेळा छापे टाकण्यात आले. त्यांची चौकशीही झालीय. पण, त्यांच्याविरोधात कुठलेही पुरावे सापडलेले नाहीत. आपण सरकारच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करतो, त्यावर लिखाण करतो, भाषण करतो, यामुळेच आपल्याला त्रास दिला जातोय, असा आरोप साथीदार यांनी केलाय. कोर्ट सिनेमाचं शुटिंग सुरू असताना गोदिंया पोलिसांनी मुंबईत येऊन शुटिंगदरम्यान साथीदार यांना अटक करण्याचाही प्रयत्न केला होता. या सर्व प्रकाराबद्दल साथीदार यांनी नाराजी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2015 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close