S M L

रेशन दुकानदाराला काळाबाजारी पडली महागात, गावकर्‍यांनी काढली नग्न धिंड

Sachin Salve | Updated On: Sep 24, 2015 07:37 PM IST

रेशन दुकानदाराला काळाबाजारी पडली महागात, गावकर्‍यांनी काढली नग्न धिंड

24 सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार करणार्‍या एका रेशन दुकानदाराची नग्न धिंड काढण्याचा प्रकार समोर आलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यात माळकवठे गावात ही घटना घडलीय. या प्रकरणी 5 गावकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय.

हा दुकानदार धुंडप्पा बगले असं या 75 वर्षांच्या रेशदुकानदाराचं नाव आहे. धुंडप्पा त्याच्या रेशदुकानात बोगस कार्डाद्वारे धान्याच वाटप करायचा. या संदर्भात गावकर्‍यांनी वारंवार तहसीलदारांकडे तक्रारी केल्या. याचाच राग मनात धरून धुंडप्पाने गावकर्‍यांना शिवीगाळ केली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या गावकर्‍यांवर या दुकानदाराच्या नातेवाईकांनी चाकूने हल्ला केला. अखेर गावकर्‍यांनी त्या दुकानदाराला मारहाण करुन त्याची नग्न धिंड काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2015 07:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close