S M L

मोदी कोणत्या देशात आहे हे आधी शोधावं लागेल, पवारांचा टोला

Sachin Salve | Updated On: Sep 24, 2015 07:33 PM IST

pawar modi24 सप्टेंबर : देशाचे पंतप्रधान सध्या कुठल्या देशात फिरतायत हे बघावं लागेल आणि त्यांचा शोध घेऊन शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल चर्चा करावी लागेल, असा उपरोधक टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावलाय. नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

शरद पवार सध्या विदर्भाच्या दौर्‍यावर आहे. आज नागपुरात मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना पवारांनी चौफर तोफ डागली. सुताची खरेदी कमी झालीये. आंतराष्ट्रीय बाजारात कापसाची स्थिती मर्यादित राहिली. कापसावर सरकारने 50 रुपयांची वाढ केली. आणि उत्पादन खर्चात वाढ केली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ही सगळी परिस्थिती आम्ही पाहिली आहे. आता सरकारशी चर्चा करायची. मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घालावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा करायची आहे. पण पंतप्रधान कुठल्या देशात आहे याचा शोध अगोदर घ्यावा लागेल. भारतात कधी परतणार आहे, किती दिवस राहणार आहे याची माहिती घेऊन त्यांची भेट घेऊन चर्चा करावी लागेल असा टोला शरद पवारांनी लगावलाय. तसंच यावेळी पवारांनी अच्छे दिनची खिल्ली उडवत एक कविताच वाचून दाखवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2015 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close