S M L

हिंदीचा अपमान करणार्‍यांना कपडे काढून मारू - अबू आझमी

16 जानेवारी हिंदीचा अपमान करणार्‍यांना रस्त्यावर कपडे काढून मारू अशी अबू आझमी यांनी भिवंडीत म्हटलंय. भिवंडी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अबू आझमी यांनी हे वक्तव्य केलं आहे. मराठीतून शपथ घेण्याच्या मुद्यावर अबू आझमी यांनी मनसेशी दोन हात केल्यानंतर आता पुन्हा एकदा हिंदीचा मुद्दा उपस्थित केला आहे. या पोटनिवडणुकीत आझमी यांचे पुत्र फरहान आझमी हे समाजवादी पक्षातर्फे उभे आहेत. अबू आझमी यांना मनसेच्या आमदारांनी हिंदीतून शपथ घेण्यापासून रोखलं होतं. या मुद्यावरुन मनसेच्या चार आमदारांना चार वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. आता पुन्हा अबू आझमी यांनी भडक वक्तव्य केल्याने आझमी विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2010 10:08 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2010 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close