S M L

केईएममध्ये डॉक्टरांना मारहाण, मार्डनं घेतला संपावर जाण्याचा निर्णय

Samruddha Bhambure | Updated On: Sep 25, 2015 03:47 PM IST

केईएममध्ये डॉक्टरांना मारहाण, मार्डनं घेतला संपावर जाण्याचा निर्णय

25 सप्टेंबर : मुंबईच्या केईएम रुग्णालयात पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून तीन निवासी डॉक्टरांना जबर मारहाण केलीये. वार्डमध्ये असलेल्या लोखंडी स्टूल आणि साळ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी ही मारहाण केली आहे. या मारहाणीत डॉ. सुहास चौधरी, डॉ. कुशल आणि डॉ. पुनील यांना गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी सकाळी 8 वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. तर या मारहाणीचा निषेधार्थ मार्ड, या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

डेंग्यू झालेल्या एका मुलीची अवस्था फारच नाजूक होती. त्यामुळे ती मुलगी त्याचवेळी कोमामध्ये गेली होती. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलगी कोमात गेल्याचं समजून मुलीच्या नातेवाईकांनी थेट लोखंडी सळ्यांनी डॉ. सुहास चौधरींवर हल्ला चढवला. तर डॉ. चौधरींना मारहाणीतून सोडवण्यासाठी गेलेल्या डॉ कुशल आणि डॉ पुनील यांनाही रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. यात तिन्ही डॉक्टरांना पाठीवर आणि हातावर जबर दुखापत झाली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डॉक्टरांवरच्या मारहाणीचा घटनेनंतर मार्ड संघटनेनं बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्खा, पोलीस नसतात, त्यामुळे वारंवार डॉक्टरांना मारहाण होते, ही नेहमीच मार्डची तक्रार राहिलेली आहे. रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्खा, पोलीस नसतात, त्यामुळे वारंवार डॉक्टरांना मारहाण होते, ही नेहमीच मार्डची तक्रार राहिलेली आहे. केईएममध्ये रोज हजारो लोक येत असतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सुरक्षेला तुम्ही वार्‍यावर कसं सोडू शकता, असा सवाल मार्डनं केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2015 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close