S M L

मुंबईतल्या मुलुंड आणि देवनार डंपिंग ग्राऊंडची कंत्राटं रद्द

Samruddha Bhambure | Updated On: Sep 25, 2015 11:30 AM IST

मुंबईतल्या मुलुंड आणि देवनार डंपिंग ग्राऊंडची कंत्राटं रद्द

25 सप्टेंबर : देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंडच्या देखभालीत अनियमितता आढळून आल्याचं चौकशीअंती स्पष्ट झाल्यानंतर दोन्ही डम्पिंग ग्राऊंडचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भात महापालिकेचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला आहे. त्यामुळे देवनार आणि मुलुंडऐवजी आता कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात येणार आहे. कांजूरमार्गमधल्या डम्पिंग ग्राऊंडसाठी 25 वर्षांकरीता 118 हेक्टर जमीन एक रुपया प्रतिचौरस मीटर दरानं देण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडला स्थानिकांना विरोध होता. त्यानंतर या दोन्ही डम्पिंग ग्राऊंडच्या देखभालीच्या कामात अनियमितता असल्याचं आढळून आल्याने अखेर त्यांचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2015 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close