S M L

शिवसेनेची 'मनसे' खेळी, भाजपला दाखवला कात्रजचा घाट

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2015 09:31 PM IST

शिवसेनेची 'मनसे' खेळी, भाजपला दाखवला कात्रजचा घाट

 

25 सप्टेंबर : मुंबई महापालिकेत खरंतर सेना-भाजप हे मित्रपक्ष...पण मनपा निवडणुका तोंडावर आल्याने हेच मित्रपक्ष परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. आता कालच उदाहरण...प्रस्ताव होता भाजपचा...पण तो हाणून पाडण्यासाठी चक्क सेना -मनसे एकत्र आलेत. थोडक्यात कायतर भाजपतर्फे पालिकेत मांडण्यात येणारे प्रस्ताव सेनेकडून सोईस्कर हाणून पाडलेत जात आहेत.

गेले काही दिवस सेना- भाजपंमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत होता. आाता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. येणार्‍या मनपा निवडणुका लक्षात घेता दोन्ही पक्षांनी आपली वेगवेगळी मोट बांधायला सुरुवात केलीय. त्यांचं प्रत्यंतर मुंबई महानगर पालिकेत दिसून येतंय. मुख्य म्हणजे भाजपला शह देण्यासाठी सेनेनं दुसर्‍या तिसर्‍या कुणाची नाही तर चक्क मनसेची साथ घेतलीय. शत्रूचा शत्रू मित्र या नात्यांन सेना-मनसेनं भाजपला एकाकी पाडण्यासाठी ही खेळी खेळल्याचं बोललं जातंय. सध्या पालिकेमधल्या भाजपच्या कुठल्याही निर्णयला सेना-मनसे मिळून विरोध करत आहंेत. इतकंच नाही तर भाजपला एकाकी पाडण्यासाठी वेळ पडल्यास इतर पक्षांनाही सेना आपल्या पंखाखाली घेतेय.

तर मनसेनं मात्र अभियंत्यांवर कारवाई वगळता सर्व मुद्यांवर सेनेला साथ दिली. त्यात आता भर पडली आहे, ती पालिकेच्या शिक्षणाधिकारी शांभवी जोशी यांना सक्तीची सेवा निवृत्ती देण्याचं. कालपर्यंत सर्वचं पक्ष या अधिकार्‍यावर तोंड सुख घेत होते. सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या गप्पा करत होते. आज मात्र जेव्हा भाजपंनं हा प्रस्ताव आणला तेव्हा सर्व पक्षांनी मिळून त्याला विरोध केला. अर्थात त्यात मनसेनं ही सेनेचीच बाजू घेतली. सध्यातरी मनसे ही साथ भाजपला एकाकी पाडण्यापूरती मर्यादीत आहे. पण भविष्यात सेना-भाजपमध्ये निर्माण होणार्‍या दरीचा फायदा घेत सध्या कमकूवत झालेल्या मनसेनं नवीनच सारीपाट मांडायला सुरुवात केली तर आश्चर्य वाटायला नको.

 शिवसेनेची 'मनसे' खेळी

- नरिमन प्वाईंटवरचे एलईडी

- मुंबईत नाईट मार्केट

- पर्युषण काळात मांसविक्री बंदी

- नालेसफाईमध्ये अभियंत्यांवर कारवाई या मुद्यांना सेनेनं कडाडून विरोध केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2015 09:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close