S M L

गणेशभक्तांनो, उद्या तिन्हीही मार्गावर मेगाब्लॉक नाही

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2015 06:09 PM IST

333mumbai_local_26 सप्टेंबर : मेगाब्लॉक म्हणजे मुंबईकरांसाठी हालाहल करणारी बातमी....पण अनंत चतुर्दशीच्यानिमित्ताने उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक नसणार आहे.

विसर्जनासाठी गणेशभक्तांची सोय व्हावी, यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर उद्या गाड्या नेमहीप्रमाणे सुरू राहतील. एवढंच नाही, मध्यरात्रीनंतरही मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या चालवण्यात येतील. मध्यरात्रीपर्यंत उशिरा विशेष गाड्याही असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2015 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close