S M L

चौकशी टाळण्यासाठी 'त्या' नेत्यांकडून विनवणी, पाटलांचा गौप्यस्फोट

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2015 10:14 PM IST

26 सप्टेंबर : सहकारातले घोटाळेबाज भ्रष्टाचाराच्या चौकशी टाळण्यासाठी अनेक मोठमोठे नेते मला येऊन भेटताहेत. असा गौप्यस्फोट सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय.अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

FMNAIMAGE31440Kolhapur_Chandrakant Patilगैरव्यवहारांच्या आरोपांवरून सध्या चौकशी सुरू असलेले अनेक बडे नेते मला घरी भेटायला येतात. ते मला एसआयटी आणि अन्य संस्थांकडून सुरू असलेली चौकशी थांबविण्याची विनंती करतात, असा गौफ्यस्फोट सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र, आम्ही या नेत्यांच्या मागणीला भीक घालणार नाही आणि सर्व चौकशा सुरू ठेवू, असं आश्वासनंही पाटील यांनी दिलं. विशेष म्हणजे सध्या सिंचन गैरव्यवहार आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अजित पवार, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना बोट कुणाकडे दाखवायचं होतं याची चर्चा सुरू झालीये. चंद्रकांत पाटलांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय खरा...पण त्यांनीही त्या मोठ्या नेत्यांची नावंही जाहीर करायला काहीच हकरत नव्हती..असो बघुयात...पाटील खरंच नावं जाहीर करतात.पण चौकशीच्या फेर्‍यात अडकलेल्या माजी मंत्र्यांपैकी तर कोणी पाटलांना भेटलं नाहीना हेही पाहिलं पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2015 10:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close