S M L

औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला

Sachin Salve | Updated On: Sep 28, 2015 12:18 AM IST

औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला

27 सप्टेंबर :  मराठवाड्याच्या राजधानी औरंगाबादमध्येही गणपती बाप्पांना मोठ्या भक्तीभावानं निरोप दिला जातोय. संध्याकाळी शहरभरात मोठ्या जल्लोषमय वातावरणात बाप्पांना निरोप दिला जातोय. दुपारनंतर घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झालीये. शहरातील मध्यवर्ती भागात जिल्हा परिषदेच्या मैदानावरील विहिरीत विसर्जनाची सोय कऱण्यात आलीये.

मोठ्या सार्वजनिक गणेशाच्या विसर्जनाची सुरुवात सायंकाळी पाच वाजेच्यानंतर सुरू झालीये. शहराच्या आसपास असलेले पाण्याचे साठे कोरडे झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मैदानावरील विहिरीत पाणी टाकून विसर्जनाची सोय झाल्यानं मोठ्या प्रमाणात गणेशाचं विसर्जन या ठिकाणी केलं जातेय.

औरंगाबादेत खर्‍या अर्थानं सायंकाळी सहाच्या नंतरच विसर्जनाला सुरुवात झालीये. गणपतींचं जिल्हा परिषद, मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन परिसरात विसर्जन करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2015 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close