S M L

व्ही.के .मूर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

20 जानेवारी सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ती यांना 2008चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. सिनेमॅटोग्राफीतल्या आजपर्यंतच्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एखाद्या सिनेमॅटोग्राफरची या पुरस्कारासाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुरू दत्त यांच्या सर्व सिनेमांच्या सिनेमॅटोग्राफीसाठी मूर्ती ओळखले जातात. सिनेमॅटोग्राफीच्या तंत्रज्ञात त्यांनी वेगळी वाट शोधली. आणि भारतीय सिनेमात कलात्मता आणली. कागज के फूल हा भारतातला पहिला सिनेमास्कोप चित्रपट बनवण्याचं श्रेय मूर्ती यांना जातं. जिद्दी, बाजी, जाल, प्यासा आणि चौदवी का चाँद यासारख्या सिनेमांची मूर्ती यांनी सिनेमॅटोग्राफी केली. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मूर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2010 11:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2010 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close