S M L

मुंबईचा समुद्र स्वच्छ होणं, हे माझं स्वप्न -नितीन गडकरी

Sachin Salve | Updated On: Sep 28, 2015 09:41 PM IST

मुंबईचा समुद्र स्वच्छ होणं, हे माझं स्वप्न -नितीन गडकरी

28 सप्टेंबर : "मुंबईतल्या समुद्रात चेहरा पाहिला तर तो स्पष्ट दिसावा असं माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन" हे वाक्य आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं. हरीत राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पाबाबत आपलं मत व्यक्त करताना मुंबईविषयीचं हे स्वप्न त्यांनी आयबीएन लोकमतला बोलून दाखवलंं. त्यावेळी वरळी वांद्रे सी लिंकचा प्रकल्पाची आठवण त्यांना झाली.

जेव्हा या प्रकल्पाची कल्पना त्यांनी मांडली होती. त्यावेळी कुणीही त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं, पण आता तोच सी लिंक मुंबईचा मानबिंदू बनलाय. सुरुवातीला त्यांना खूप विरोध झाला होता आणि हे शक्य नाही, असचं अनेकांना वाटलं होतं. पण तो मानबिंदू मुंबईला मिळालाही. आज सी लिंक मुंबईत वर्दळीच्या रस्त्याला पर्याय ही ठरवलाय, त्याच बरोबर पर्यटनाचं आकर्षण ही. त्याच पद्धतीनं मुंबईचा समुद्र स्वच्छ दिसावा हे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करीन असं म्हणणंही मुंबईकरांसाठी शुभ संकेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2015 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close