S M L

11/7 बॉम्बस्फोट प्रकरणी 5 दोषींना फाशी, 7 जणांना जन्मठेप

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2015 01:07 PM IST

11 7 mumbai local blast30 सप्टेंबर : 2006 साली झालेल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आज दोषींना शिक्षा जाहीर केली जाणार आहे. विशेष मोक्का कोर्ट आज (बुधवारी) ही शिक्षा जाहीर करणार आहे. याप्रकरणी 12 आरोपींना कोर्टानं दोषी ठरवलंय. तर एकाची निर्दोष सुटका करण्यात आलीय. सरकारी पक्षानं 8 आरोपींसाठी फाशीची तर 4 आरोपींसाठी जन्मठेपेची मागणी केलीय.

9 वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेतल्या 7 लोकलमध्ये प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवून अतिरेक्यांनी स्फोट घडवला होता. लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात हे स्फोट झाले होते. यात 189 निष्पापांचा जीव गेला होता. तर 824 जण जखमी झाले होते. 11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेत 10 मिनिटांच्या अंतरात हे स्फोट झाले होते. मुंबईतल्या खार रोड-सांताक्रूझ दरम्यान पहिला, तर वांद्रे-खार रोडदरम्यान दुसरा, बाँबस्फोट झाला. जोगेश्वरीला तिसरा आणि माहिम जंक्शनदरम्यान चौथा बॉम्बस्फोट झाला. मीरा रोड ते भाईंदरदरम्यान पाचवा तर माटुंगा रोड ते माहिमदरम्यान सहावा बॉम्बस्फोट झाला. तर बोरिवलीला सातवा स्फोट झाला होता.

लष्कर-ए-तोयबानं या साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. या बॉम्बस्फोटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचाही हात असल्याचा संशय होता. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पोलीस पथकानं (एटीएस) याप्रकरणी 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.त्यामध्ये कमाल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, अब्दुल शेख, मुझमिल शेख, सोहील शेख, जमीर शेख, नावेद खान आणि असिफ खान यांचा समावेश आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी 192 साक्षीदारांची साक्ष तपासून त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत.

11/7 मुंबई बॉम्बस्फोट

- 11 जुलै 2006 : 7 लोकल ट्रेन्समध्ये बॉम्बस्फोट

- 189 ठार, 824 जखमी

- पश्चिम रेल्वेत प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवून घडवले स्फोट

- भाईंदर, बोरिवली, जोगेश्वरी, खार रोड, वांद्रे, माहीम, माटुंगा रोडमध्ये स्फोट

- संध्याकाळी 6.24 ते 6.35 दरम्यान बॉम्बस्फोट

- सरकारी पक्षानं 192 साक्षीदार तपासले

- बचाव पक्षानं 51 साक्षीदार तपासले

- 8 आयपीएस अधिकारी, 5 आयएएस अधिकारी, 8 डॉक्टरांचा जबाब नोंदवला

- 5,500 पानांचे पुरावे तपासले

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2015 08:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close