S M L

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच ?

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2015 01:08 PM IST

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच ?

30 सप्टेंबर : सुवर्णमहोत्सवी वर्षात शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार हे जवळपास आता निश्चित झालंय. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. सर्व कायदेशीर परवानग्या घेण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्यास सहमती दर्शवली आहे.

शिवाजी पार्क शांतता क्षेत्र घोषीत झाल्यामुळे गेली दोन वर्ष दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होवू शकला नाही. पण, आता राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असलेली शिवसेना कायदेशीर मार्ग काढून सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेनेचा दसरा मेळाव्यात शस्त्र पूजनाचा कार्यक्रम असतो. त्यामुळे शिवाजी पार्कवर सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळणारी कायदेशीर परवानगी दसरा मेळावासाठी मिळू शकते. अशाप्रकारे कायद्याच्या चौकटीत दसरा मेळावा बसवण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत. येत्या विजयादशमीला शिवाजी पार्कवर शिवसेना सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2015 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close