S M L

दारू,सिगारेटवरचा टॅक्स राष्ट्रवादीला का झोंबला ? -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Oct 2, 2015 12:26 PM IST

02 ऑक्टोबर : सरकारनं दारू आणि सिगारेटवर टॅक्स लावल्यानं राष्ट्रवादीला दु:ख का होतंय ?असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. शेतकर्‍यांना मदत होईल या हेतूनं हा टॅक्स लावला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते अमरावतीत बोलत होते.

cm fadanvis on ncp

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने 350 कोटींचा एलबीटी रद्द करून विक्रीकरात वाढ केलीये. 50 कोटीखाली उलाढाल असलेल्या उद्योगांसाठी एलबीटी कर रद्द करण्यात आला.

त्यामुळे सिगारेट, कोल्ड्रिंक्स आणि दारूवर 5 टक्के विक्रीकर वाढवण्यात आलाय. यामुळे 1600 कोटींचा महसूल गोळा होईल.

राष्ट्रवादीने विक्रीकर वाढीवर जोरदार टीका केली. राज्यसरकारने सर्वसामान्य जनतेवर कर लादलाय अशी टीका नवाब मलिक यांनी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्यात वरूडमध्ये राष्ट्रीय कृषी आणि संत्रा महोत्सवाच्या कार्यक्रम उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

दुष्काळ परिस्थितीमुळे विक्रीकरात वाढ कऱण्यात आलीये. त्यामुळे दारू आणि सिगारेटवर 5 टक्के कर वाढवण्यात आला. आता तर आम्ही असले काही घेत नाही. त्यामुळे 2 रूपये हे त्यांच्याच खिश्यातून जातील. पण, राष्ट्रवादीला याचं इतकं दु:ख का ?, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2015 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close