S M L

लेखकांसाठी बॉलिवूडमध्ये बेमुदत संप, शुटिंग ठप्प

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2015 02:09 PM IST

लेखकांसाठी बॉलिवूडमध्ये बेमुदत संप, शुटिंग ठप्प

bollywood strike03 ऑक्टोबर : चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ यांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. इंडस्ट्रीत लेखकांना मिळणारी हीन वागणूक बदलावी यासाठी हा संप पुकारण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

बॉलिवूडमध्ये कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत सगळ्यांनाच भरघोस मानधन दिलं जातं. लेखकाची मात्र तुटपुंज्या मानधनावर बोळवण करून त्याला अनेक जाचक अटींमध्ये अडकवलं जात असल्याचं निदर्शनास आलंय.

ही परिस्थिती बदलावी यासाठी लेखकांच्या संघटनेने संपाचं हत्यार उगारलंय. या संपाला कलाकार,तंत्रज्ञ, आणि इतर संघटनांनीही पाठिंबा दिल्यानं आजपासून मुंबईत सुरू असणारं सारं चित्रिकरण ठप्प होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2015 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close