S M L

लेट्स फुटबॉल, ISLच्या दुसर्‍या सीझनला आजपासून सुरुवात !

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2015 08:15 PM IST

लेट्स फुटबॉल, ISLच्या दुसर्‍या सीझनला आजपासून सुरुवात !

03 ऑक्टोबर : भारताची हक्काची फुटबॉल लीग म्हणजे इंडियन सुपर लीग...इंडियन सुपर लीगच्या दुसर्‍या सीझनला आजपासून सुरूवात होतेय...मुंबई सीटी एफसी, चेन्नई एफसी,ऍटलेटीको कोलकात्ता,एफसी गोवा, केरला ब्लास्टर्स, दिल्ली डायनोमोस, नॉर्थ-ईस्ट युनायटेड आणि एफसी पुणे सीटी...या आठ टीम पुन्हा फुटबॉलच्या मैदानात भिडणार आहे.

इंडियन सुपर लीग आपल्या दुसर्‍या सीझनसाठी सज्ज आहे..सगळ्या टीम्सची तयारीही झालीये. पहिल्या सिझनचे चॅम्पियन कोलकात्त्याची टीम या सिझनमध्येही फॉर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे एफसी मुंबईही नव्या जोषात सिझनला सुरुवात करणार आहे. सुनील छेत्रीमुळे मुंबईच्या टीमकडून अपेक्षा वाढल्यात.

फुटबॉलच्या या मैदानात फक्त फुटबॉलपटूचं नाहीत तर, त्यांना प्रोत्साहन देणारे स्टार मालकही आहेत. सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, रणबीर,ऋतिक रोशन, जॉन अब्राहिम,अभिषेक बच्चनही आपल्या टीम्सना चिअर करण्यासाठी मैदानात असणार आहेत. भारतीय फुटबॉल जागतिक स्तरावर आपलं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असताना ही लीग महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2015 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close