S M L

'भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणार तर त्याची जबाबदारीही घ्या'

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2015 05:30 PM IST

'भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणार तर त्याची जबाबदारीही घ्या'

03 ऑक्टोबर : रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना सेवाभावी वृत्तीने अनेकदा नागरिक खाऊ-पिऊ घालताना, काळजी घेताना पहायला मिळतात. पण आता जर तुम्ही कुत्र्यांची अशी काळजी घेत असाल तर तुम्हाला नियमांचे पालन करावे लागणार आहे. 'ऍनिमल वेलफेअर बोर्डानं' याबद्दल नियमावली प्रसिद्ध केलीये.

भटक्या कुत्र्यांमुळे अनेकदा नागरिकांना त्रास झाल्याच्या, नागरिकांवर हल्ला झाल्याच्या घटनाही नेहमी होताना दिसतात. त्यामुळे आता जर का भटक्या कुत्र्यांची काळजी घ्यायची असेल तर श्वानप्रेमींना काही नियम पाळावे लागणार आहेत. 'ऍनिमल वेलफेअर बोर्डानं' यासंबंधी काही नियम तयार केले आहेत.

जर तुम्ही भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत असाल तर त्यांची आरोग्य तपासणी आणि नसबंदीची काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच मोकळ्या जागेत किंवा सोसायटीच्या आवारात लहान मुलं खेळत असता अशा परिसरापासून भटक्या कुत्र्यांना दूर ठेवावे लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणीही कुत्र्यांना खायला घालू नये. जर तुम्ही कुत्र्यांची काळजी घेत असाल तर त्याने अस्वच्छ केलेला परिसर स्वच्छ करून ठेवण्याची जबाबदारीही तुमचीच असणार आहे.

'ऍनिमल वेल्फेअर बोर्डा'चे नियम

भटक्या कुत्र्यांची आरोग्य तपासणी

नसबंदीची काळजी घ्यावी

लहानमुलांपासून भटक्या कुत्र्यांना दूर ठेवणे

गर्दीच्या ठिकाणी कुत्र्यांना खायला घालू नका

कुत्र्यांनी अस्वच्छ केलेला परिसर स्वच्छ ठेवणे

मात्र या कुत्र्यांना वळण लावण्याची जबाबदारी श्वानप्रेमींची नसेल

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2015 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close