S M L

झुंज संपली, देवराम ढोरे यांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2015 07:05 PM IST

devraj dhere03 ऑक्टोबर : अक्षम्य दुर्लक्षामुळे हकनाक बळी जातात याची पुन्हा प्रचिती आली आहे. मुंबई पोलीस दलात काम करणारे देवराम ढोरे यांचा अखेर दुदैर्वी अंत झालाय. कामावरुन परतत असताना ट्रेनच्या एका अपघातामध्ये ढोरे जखमी झाले होते. यानंतर त्यांची व्यथा आयबीएन लोकमतने मांडली होती.

मुंबई पोलीस दलात काम करणारे देवराव ढोरे. मुंबई पोलीस दलातील 22 वर्षाच्या निष्कलंक सेवेनंतरही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. 28 मार्च 2012 रोजी कामावरुन परतत असताना काँन्स्टेबल ढोरे एका रेल्वे अपघातात गंभीर जखमी झाले होते. या अपघातामध्ये डोक्याला जबर मार लागल्यानं देवराम ढोरे यांची अवस्था मरणापेक्षाही वाईट झाली होती. या एका अपघातानं संपूर्ण ढोरे कुटुंबाचं आयुष्य उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होतं आता तर ढोरे यांचं निधन झाल्यामुळे होती नव्हती ती आशा आता संपुष्टात आलीये.

ढोरे यांना कामावर गैरहजर राहण्याचा दाखला देत मुंबई पोलिसांनी त्यांना रुग्णता सेवानिवृत्त केलं होतं. मात्र, पोलीस प्रशासनाच्या या आडमुठ्‌या धोरणामुळे ढोरे यांना मिळणारा पगार जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आला होता. याबरोबर निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युटीमधूनच पोलीस दलाचं झालेलं नुकसानही भरुन काढण्यात येत होती.

ढोरे कुटुंबियांची व्यथा आयबीएन लोकमतने मांडल्यानंतर प्रशासनाला तर जाग आलीच. पण,महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी मदत देऊ केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीनं ढोरे यांच्या उपचाराचा सगळा खर्चही केला जात होता. मात्र ज्या पोलीस दलासाठी आयुष्य पणाला लावलं त्या पोलीस दलानं आणि महाराष्ट्र सरकारनं ढोरे यांच्या साठी शेवटपर्यंत काहीच केलं नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2015 07:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close