S M L

युरोपमधील सर्बियात 'सनातन'वर बंदी

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2015 09:20 PM IST

युरोपमधील सर्बियात 'सनातन'वर बंदी

03 ऑक्टोबर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक केल्यानंतर सनातन संस्था वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.अशातच आता सनातन संस्थेवर युरोपातल्या सर्बिया देशात बंदी घालण्यात आली आहे. बेलग्रेड या राजधानीच्या शहरात सनातनचं केंद्र होतं.

बेलग्रेडमध्ये एक महिला हे केंद्र चालवत होती. ती वारंवार अमेरिकेतल्या अटलांटा सनातन मंदिरात जायची. बेलग्रेडच्या केंद्रात गूढ क्रिया चालतात आणि अगम्य भाषेत मोठमोठ्याने प्रार्थना होतात अशा स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. या प्रार्थनांमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण स्थानिक मुलांना देण्यात यायचं, त्यामुळे पालक चिंतित होते. काळ्या काचा लावलेल्या अनेक वाहनांची तिथे ये-जा सुरू झाली होती.

हे केंद्र पिवळ्या रंगाच्या भाड्याच्या इमारतीत होतं. त्या ठिकाणाचा उल्लेख स्थानिक वृत्तपत्र 'यलो हाउस' असा करायचे. अज्ञात व्यक्तीने सनातनच्या केंद्रावर दगडफेक करून पेट्रोल बाँब फेकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

मानवी हक्कांचे मंत्री आणि धार्मिक विषयांचे मंत्री यांनी सनातनच्या केंद्राला भेट दिली. दरम्यान, सर्बियात आमचं अधिकृत केंद्रं नव्हतं, पण साधक आमच्या संपर्कात होते अशी कबुली सनातनने दिलीय. तर सनातनचा रशियन माफियाशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2015 09:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close