S M L

कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट आणि सेफसिटी बनवायचंय- मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Oct 4, 2015 05:02 PM IST

कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट आणि सेफसिटी बनवायचंय- मुख्यमंत्री

04 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार पाचशे कोटी रुपयांचं निवडणूक पॅकेज जाहीर केलं आहे. कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना विकास हवा आहे आणि या शहरांचा विकास करणं आमची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्हाला केवळ स्मार्ट सिटी नाही तर सेफ सिटी बनवायचं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

कल्याण डोंबिवली महापालिकच्या प्रचाराचा नारळ भाजपनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फोडला. डोंबिवलीमध्ये आज भाजपच्या विकास परिषदेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, विनोद तावडेही हजर होते. यावेळी भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सेनेला दूर ठेवण्यात आलं आहे.

यावेळी बोलतांना मुख्यमत्र्यानी, दुसर्‍या शहरावर अन्याय करुन कल्याण-डोंबिवली समावेश स्मार्ट सिटीत समावेश केल्याचं सांगितलं. या स्मार्ट सिटीत सामान्यांना संधी तर चाकरमान्यांना क्वालिटी लाईफ मिळेल, असं आश्वासन त्यांनी डोंबिवलीकरांना दिलं. तसंच कल्याण-डोंबिवलीचा विकास करण्यासाठी बाहेरुन गुंतवणूक येण्यास तयार आहे. पण त्यासाठी टक्केवारी खाणार्‍यांची नाही तर स्वच्छ कारभाराची गरज आहे. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या परिषदेच्या निमित्तानं अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अभिनेता सचिन खेडेकर स्टेजवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2015 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close