S M L

नवी मुंबईत अनधिकृत रहिवाशी इमारतींवर कारवाईला सुरुवात

Samruddha Bhambure | Updated On: Oct 5, 2015 01:44 PM IST

नवी मुंबईत अनधिकृत रहिवाशी इमारतींवर कारवाईला सुरुवात

05 ऑक्टोबर : नवी मुंबईतल्या दिघा परिसरात अनधिकृत इमारतींवर आज कारवाीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे रहिवाशांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलंय. एम.आय.डी.सीच्या या कारवाईविरोधात रहिवासी रस्त्यावर उतरलेत. एमआयडीसीने 94 पैकी 90 इमारतींमधल्या 1836 कुटुंबांना वृत्तपत्राच्या माध्यमातुन सात दिवसांची पब्लिक नोटीस बजावण्यात आली होती. रहिवाशांना दिलेली ती मुदत आज संपतेय त्यामुळे सुरूवातीला पार्वती, शिवराम आणि केरू प्लाझा या तीन इमारतींवर कारवाईची शक्यता आहे. पण आम्ही आता राहायचं कुठे, हा एकच सवाल करत या कारवाईला रहिवाशांचा मात्र जोरदार विरोध केला आहे.

अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एम.आय.डी.सी, सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांनी मिळून ही कारवाई केलीय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिघ्यातील 94 अनधिकृत इमारतींवर धडक कारवाई करण्यात येतेय. त्यामुळे या इमारतीत राहणारे 1836 कुटुंबं बेघर होणार आहेत.

दरम्यान, कारवाईला विरोध करण्यासाठी महिला आणि शाळकरी मुलांची ढाल केली जातेय. मात्र पोलिसांनी विद्यार्थ्यांना शाळेत परत पाठवले. मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी देताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परत नेलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही या कारवाईला विरोध करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. रहिवासी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे परिसरातलं वातावरण तणावपूर्ण बनलं आहे.

 • नवी मुंबई महापालिका करत असलेल्या या कारवाईवर काही प्रश्न उपस्थित होताहेत.

  1) 125 अनधिकृत इमारती उभारल्या जाईपर्यंत एकदाही एमआयडीसीने कारवाई का केली नाही?

  2) अनधिकृत इमारती उभारणीसाठी अभय देणार्‍या एमआयडीसी अधिकार्‍यांवर कारवाई का करण्यात आली नाही?

  3) अनधिकृत इमारती उभारणार्‍या भूमाफियांवर गुन्हे दाखल का केले नाहीत?

  4) अनधिकृत इमारती उभारणार्‍या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द का केले नाहीत?

  5) ठाणे, मुंब्राप्रमाणे इमारती कोसळून अनेकांचे जीव जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2015 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close