S M L

डॅडींना दणका, मोक्का हटवण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Samruddha Bhambure | Updated On: Oct 5, 2015 07:06 PM IST

arun gavli

05 ऑक्टोबर : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्याहत्येप्रकरणी जेलमध्ये असलेल्या अरुण गवळींना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. हायकोर्टाने अरुण गवळींवरील मोक्का हटवण्यास नकार दिला आहे.

मार्च 2008 मध्ये घाटकोपरमधील असल्फा इथे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मे 2008 मध्ये अरुण गवळींना अटक करण्यात आली आहे. साकीनाका इथल्या बांधकामांता दोघा व्यावसायिकांना सहकार्य करण्यास जामसंडेकर यांनी नकार दिला होता. या बांधकाम व्यावसायिकांनी गवळी टोळीकडे जामसंडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली होती. 2012 मध्ये कोर्टाने गवळींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. कोर्टाने गवळींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्कांतर्गत शिक्षा सुनावली होती.

मोक्का कायदा हटवावा अशी मागणी गवळींच्या वतीने हायकोर्टात करण्यात आली होती. आपण गेली अनेक वर्षं गुन्हेगारी जगतापासून दूर आहोत आणि आपल्यात सुधारणा झाली असल्याचं गवळीने आपल्या याचिकेत म्हटलं होतं.पण गवळी टोळी अजूनही सक्रिय असल्याचं दिसून आलं होतं.त्यामुळ मुंबई हायकोर्टाने या याचिकेला केराची टोपली दाखवत गवळीची मागणी फेटाळून लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2015 07:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close