S M L

कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत युती झाली पाहिजे -दानवे

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2015 09:10 AM IST

danve_on_fir07 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत युती झाली पाहिजे असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलंय. खरंतर अनेक दिवसांपासून युती व्हावी की नाही यावर अनेक जण आपलं मत नोंदवत आहे.

3 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सभा घेऊन एकला चलो रेचे संकेत दिले. मात्र आता दानवेंनी हा गुगली टाकलाय.

दरम्यान, सेनेत युती करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे कल्याणमधील भाजपचे आमदारांनी सेनेसोबत युती नकोच अशी जाहीरपणे भूमिका मांडलीये.

एवढंच नाहीतर भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी तर शिर्डीच्या साईबाबांना सेनेसोबत युती नको असं साकडंच घातलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2015 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close