S M L

रुद्र पाटीलला अटक करण्यासाठी काय केलं?, हायकोर्टाचा सवाल

Samruddha Bhambure | Updated On: Oct 7, 2015 08:49 PM IST

रुद्र पाटीलला अटक करण्यासाठी काय केलं?, हायकोर्टाचा सवाल

07 ऑक्टोबर : रुद्र पाटील याला शोधण्यासाठी तपास यंत्रणांनी काय केलं, त्याचा शोध कसा घेत आहेत? असा सवाल करत, 20 ऑक्टोबरपर्यंत नव्यानं रिपोर्ट दाखल करण्याचे मुंबई हायकोर्टाने आज (बुधवारी) एसआयटीला दिले.

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याच्या चौकशीतून अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही. तर मुख्य संशयित आरोपी रुद्र पाटीलचाही काही सुगावा लागलेला नाही. दुसरीकडे रुद्र पाटीलच्या पत्नीने समीर गायकवाडचं वकीलपत्र घेतलं आहे. त्यामुळे रुद्र पाटील आणि समीर गायकवाड यांचा संबंध असल्याचं स्पष्ट होतं. मग तपास यंत्रणा आवश्यक पावलं का उचलत नाही, असा सवाल याचिकादारांनी उपस्थित केला.

यावेळी डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने तर कॉ. पानसरेंच्या हत्येप्रकरणी एसआयटीने सीलबंद स्वरुपात तपासाचा अहवाल सादर केला. एसआयटीने दिलेल्या अहवालानुसार पानसरे हत्या प्रकरणात रुद्र पाटील याचं नाव पुढे आलं. तो मडगाव बॉम्बस्फोटातला फरार आरोपी आहे. पानसरे हत्येमागे रुद्र पाटील मुख्य सुत्रधार असल्याचं समोर आलं आहे. तरीही त्याला पकडलं नसल्यानं तपास समाधानकारक नाही, अशी नाराजी व्यक्त करत पाटीलला शोधण्याकरता काय केलं, याचा अहवाल 20 ऑक्टोबरपर्यंत दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2015 08:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close