S M L

'हाच तो मारेकरी', शाळकरी मुलाने समीर गायकवाडला ओळखलं

Samruddha Bhambure | Updated On: Oct 8, 2015 12:37 PM IST

'हाच तो मारेकरी', शाळकरी मुलाने समीर गायकवाडला ओळखलं

08 ऑक्टोबर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एका 14 वर्षांच्या शाळकरी मुलाने समीर गायकवाडला ओळखलं, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. कॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरेंसोबत सहा जणांसमोर समीरसह बारा संशयितांची ही ओळख परेड झाली.

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित समीर गायकवाड याची कळंबा कारागृहात उमा पानसरेंसोबत सहा जणांसमोर काल (बुधवारी) ओळख परेड झाली. यावेळी समीरकडे बोट करून 'हाच तो मारेकरी' असल्याचे प्रत्यक्षदर्शी 14 वर्षांच्या शाळकरी मुलाने पोलिसांना सांगितलं, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला 16 सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. एका साक्षीदाराने समीरला ओळखल्यामुळे या प्रकरणाला अधिक बळकटी आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2015 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close