S M L

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपवर थेट हल्लाबोल

Samruddha Bhambure | Updated On: Oct 9, 2015 01:57 PM IST

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपवर थेट हल्लाबोल

09 ऑक्टोबर : कल्याण- डोंबिवलीत महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीबाबत एकीकडे चर्चा सुरू असताना, शिवसेनेने भाजपवर थेट निशाणा साधला आहे. आपल्या पक्षाचे नगरसेवक फोडण्यासाठी भाजपकडून पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी काल रात्री उशीरा पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला आहे.

गेल्या 25 वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची एकत्रित सत्ता आहे. तरी यंदाच्या निवडणुकीत युती होणार का नाही यावरून तणाव निर्माण झालं आहे. दोन्ही पक्षांकडून जागावाटपाच्या अवास्तव मागण्या होत असल्याने युतीच्या चर्चेत अर्थ नसल्याचंही स्पष्ट होऊ लागलं होतं. त्यातच, मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्यास सज्ज राहा, असा स्पष्ट संदेश स्थानिक नेत्यांना दिल्याने युती होण्याच्या आशा मंदावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपवर थेट निशाणा साधत आमचे नगरसेवक फोडण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप लांडगे यांनी केल्याने युतीची उरलीसुरली आशाही संपुष्टात आल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे ती अबाधित राहावी अशी आमची भावना आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिलीये. पण, भाजपने मात्र युतीचे सगळे दरवाजे बंद केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2015 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close