S M L

मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमांचं उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2015 09:26 PM IST

मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमांचं उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही

09 ऑक्टोबर : येत्या 11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिलच्या जागी प्रस्तावित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहेत. यासोबतच मेट्रो प्रकल्पांचंही भूमिपूजन होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत. उद्धव ठाकरेंना निमंत्रणही देण्यात आलं नसल्याचं कळतंय.

शिवसेना आणि भाजप सत्तेवर विराजमान झाल्यानंतरही भाजप आणि सेनेतली धुसफूस काही कमी झाली नाही. त्याची प्रचिती या ना त्या प्रकरणातून अनेक वेळा दिसून येतेय. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन 11 ऑक्टोबरला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. पण, शिवसेनेचे पक्षप्रपुख उद्धव ठाकरे हे रविवारी बीडच्या दौर्‍यावर असणार आहेत. रविवारी उद्धव ठाकरे बीडचा दुष्काळदौरा करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार आहे. मुळात उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमांचं निमंत्रणच देण्यात आलं नसल्याचं कळतंय. त्यामुळे आम्हाला शेतकर्‍यांना मदत देणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही पहिली शेतकर्‍यांना मदत देऊ असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2015 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close